१८४५ साली हार्वर्डमधे शिक्षण घेतलेला एक २८ वर्षांचा युवक वॉल्डनच्या तळ्याकाठी राहाण्यास गेला. वॉल्डनकाठी स्वतःच्या हाताने एक झोपडी बांधून तो दोन वर्षे राहिला. त्याला जगण्यासाठी कशाची आवश्यकता असते याचा अभ्यास करायचा होता. त्या मुक्कामात केलेली वर्णने, राजकीय मते, तत्वज्ञान, समाज आणि एकांतवास याबद्दल त्याने केलेल्या नोंदी व विचारमंथन म्हणजे हेन्री डेव्हिड थोरोचे वॉल्डन हे पुस्तक. थोरोचे वॉल्डन का वाचावे याचे उत्तर अत्यंत सोप्पे आहे. गरज आणि हव्यास यातील धुसर सीमारेषा थोरो ठळक करतो. साधेपणाने राहाण्याचा उपदेश तो करतो पण स्वतः तसे राहण्याचे प्रयोग केल्यावर. तरुणांनी हे पुस्तक जरूर वाचावे कारण खरे सुख कशाला मानावे हे समजण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हे पुस्तक वाचणे हा होय, हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे कारण ज्यांनी हे वाचले आहे त्यांचे आयुष्य बदलून गेलं असे ते सांगतात आणि असे सांगणाऱ्यात फार थोर माणसे आहेत. उदा. टॉलस्टॉय, मार्क्स, महात्मा गांधी आणि असे अनेक.
Author: Henry David Thoreau | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 320