आधुनिक वित्तव्यवस्थेच्या विकासासह बॉरन बफे आणि बर्कशायर हॅथवे यांचा विलक्षण इतिहास लिहिणं ही एक कठीण आणि साहजिकच मोठी गोष्ट आहे. टॉड ए. फिंकल यांनी या वाचनीय आणि अद्ययावत माहिती देणाऱ्या पुस्तकातून नेमकी हीच गोष्ट केली आहे.’
– अॅडम जे. मीड
(द कम्प्लीट फिनान्शियल हिस्ट्री ऑफ बर्कशायर हॅथवेचे लेखक, मीड कॅपिटल मॅनेजमेंटचे सीईओ व मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि वॉचलिस्टइन्व्हेस्टिंग डॉट कॉमचे संस्थापक.)
‘फिंकल यांनी वॉरन बफे यांच्या जीवनाविषयीचे व करिअरविषयीचे महत्त्वाचे विचार मांडले आहेत. बफे हे एक द्रष्टे व्याबसायिक आहेत आणि त्यांच्या जागतिक दृष्टिकोनांना ‘मिडवेस्टर्न’ भागातील मूलभूत विचारांनी व त्यांच्या बालपणीच्या व किशोरावस्थेतील काळातील कौटुंबिक वाताबरणानं आकार दिला आहे. या विलक्षण संबंधाचा शोध घेतल्याबद्दल आम्ही फिंकल यांच्याशी कृतज्ञ आहोत.’
– मार्क पिगट
(पकार इंकचे कार्यकारी अध्यक्ष)
Author: Todd A. Finkle | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 326