न्युरोसर्जन म्हणून दहा वर्षांचे प्रदीर्घ प्रशिक्षण संपवता संपवता, वयाच्या केवळ छत्तिसाव्या वर्षी पॉल कलानिधी यांना फुप्फुसाचा कर्कराग झाल्याचे आणि तो चौथ्या म्हणजे गंभीर स्थितीला पोहोचल्याचे निदान झाले. रोज मृत्यूशी झगडणाऱ्या रोग्यांबर रात्रंदिवस उपचार करणारे डॉक्टर एक दिवस स्वतः मरणाशी झगडणारे रुग्ण बनले. ते आणि त्यांची पत्नी रंगवत असलेले जीवनाचे चित्र विरून गेले, स्वप्न भंगून गेले. या जीवनातील फार मोठ्या, क्लेशकारक बदलाचे फार हृदयस्पर्शी चित्रण, ‘आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा मर्त्य आहे हे सत्य माहीत असूनसुद्धा माणसाचे आयुष्य अर्थपूर्ण, महत्त्वपूर्ण कसे बनते?’ या प्रश्नाने झपाटून टाकलेल्या पॉल कलानिधी या स्टॅन्फोर्ड येथे माणसाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या, त्याची ओळख ठरणाऱ्या मेंदू या अवयवावरील उपचारांचे प्रशिक्षण घेणाऱ्या नवागत न्युरोसर्जनने, एका प्रेमळ आणि लवकरच पिता बनण्याची बाट पाहणाऱ्या पतीने या ‘व्हेन ब्रेथ बिकम्स एअर’ या पुस्तकात केलेले आहे.
Author: Paul Kalanithi | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 232