झेन तत्त्वज्ञान (Zen Tatvadnyan)

By: Sanjay Kaptan (Author) | Publisher: Sakal Prakashan

Rs. 250.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description
झेन तत्त्वज्ञानाचा उगम भारतात झाला असला तरी, त्या लहानशा ओढ्याचा विशाल प्रवाह मात्र चीन, जपान व कोरियासारख्या देशांत विकसित झाला, हे लक्षात घेतले पाहिजे. या पौर्वात्य तत्त्वज्ञानाचा मनःस्नेही प्रकाश पाश्चिमात्य लोकांनादेखील प्रसन्न करणारा वाटला. त्यांनी तो व्यक्तिगत व संघटनात्मक आयुष्यात आचरणात आणला, हे विशेष! झेनचे तत्त्वज्ञान गूढ आणि जटिल नाही; तर ते वैचारिक शिस्त लावणारे व आचरणात आणता येतील असे साधे व सोपे धडे देणारे अनुभुतीजन्य तत्त्वज्ञान आहे. द्वेष, ईर्ष्या, हाव, मोह, लोभ आणि अकारण गर्व या सर्वांमुळे आपण स्वतःचे खरे स्वरूप विसरतो. ज्ञानाच्या व विवेकाच्या सामर्थ्याने अज्ञानाचा पराभव करता येतो, हे झेनचे व्यवहार्य आणि प्रभावी सूत्र आहे. स्वतःला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर प्रथम विजय मिळवा, ही झेन तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहेत. ती जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना सारखीच लागू पडणारी आहेत.
Details

Author: Sanjay Kaptan | Publisher: Sakal Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 166