झेप उच्चतेच्या दिशेने (Zep Ucchatechya Dishene)

By: Zig Ziglar (Author) | Publisher: MyMirror Publishing House

Rs. 240.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

जगण्यापासून स्थिरतेकडे आणि स्थिरतेकडून यशाकडे घेऊन जाणारे पुस्तक प्रगती करायची असेल तर ध्येय असायला हवं हे आपण सगळे जाणतोच. पण नुसतं ध्येय असून चालत नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी काही पावलं उचलावी लागतात. या पुस्तकात ध्येय निश्चित कसं करायचं इथपासून ते ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक सहा पायऱ्या लेखकाने दिल्या आहेत. या पायऱ्या वापरून लेखकाने स्वतःचं २० किलो वजन कमी करण्याचं ध्येय कसं पूर्ण केलं याचं उदाहरणही दिलं आहे. कुठल्याही क्षेत्रात उच्चतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य ते इनपुटस् कुठे आणि कसे द्यायचे याचं प्रशिक्षण या पुस्तकातून तुम्हाला मिळेल. 'झेप उच्चतेच्या दिशेने' हे पुस्तक तुम्हाला वरच्या दिशेने अर्थात प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी मदत करेल. लेखकाविषयी झिग झिगलर यांचं वर्णन 'मास्टर ऑफ मोटिव्हेशन, अमेरिकेचा आयकॉन, सेल्समनचा सेल्समन' असं केलं जातं आणि झिगलरची पुस्तकं म्हणजे 'इतिहासावर कायमचा प्रभाव टाकणारा वारसा' असं म्हटलं जातं. चारित्र्य, दृष्टिकोन आणि कौशल्य या तीन गोष्टींचा वापर करून संतुलित यश कसं मिळवायचं, हाच त्यांच्या लिखाणाचा गाभा आहे, ज्याचा अब्जावधी लोकांना फायदा झाला आहे.

Details

Author: Zig Ziglar | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 176